चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील २० वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष देत व तिचे व्हिडीओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका तरूणाविरोधात चाळीसगाव शहर पोलीसास्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरातील २० वर्षीय तरुणीस तब्बल २०१९ पासून नियमित लग्नाचे आमिष देत विश्वास संपादन करून व तु जर आली नाही तर माझ्या मोबाईल मधील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करून तुझी बदनामी होणार असल्याची धमकी देत तरुणीवर शहरातील एका पडलेल्या खोल्यामध्ये अत्याचार केला यावेळी तरुणीने लग्नाची विचारणा केली असता तिला नकार देत मारहाण देखील संशयीत आरोपी विष्णू पवार याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि.सागर ढिकले हे करीत आहेत.