लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मारवाड पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्याची चार्टशीट पाठविण्यासाठी 15 हजाराची लाच घेताना पोलीस नाईक लाज लूजपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले आहे
तक्रारदार, त्यांचे वडील व भाऊ यांचे विरुध्द मारवड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 105/2021, भा.द.वि. कलम-354,448 अन्वये गुन्हा दाखल असुन सदर गुह्यात मदत करून सदर गुह्याचे चार्जशीट लवकर पाठविण्याच्या मोबदल्यातपोलीस नाईक भास्कर नामदेव चव्हाण यांनी 15 हजाराची मागणी केली होती. याप्रकरणी DYSP. शशिकांत एस. पाटील, PI.श्री.संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी जुनी पोलीस लाईन,अमळनेर येथे सापळा लावला असताना पंचासमक्ष लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी गुन्हा अमळनेर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.