Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » १० वर्षाच्या चिमुकल्यासमोर पित्याने घेतली विहिरीत उडी !
    क्राईम

    १० वर्षाच्या चिमुकल्यासमोर पित्याने घेतली विहिरीत उडी !

    editor deskBy editor deskJune 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील ममुराबाद शिवारातील म्हाळसा देवी मंदिराजवळील विहिरीत १० वर्षांच्या मुलासमोरच पित्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी ९:३० वाजता घडली. वडील येतील या अपेक्षेने भांबावलेला मुलगा विहिरीच्या ठिकाणी ५-१० मिनिटे उभा राहिला, मात्र वडील येत नसल्याने शेजारील शेतातील शेतकऱ्यांना मुलाने माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. समाधान भास्कर कुंभार (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद येथील पटेलवाडा परिसरात समाधान कुंभार हे पत्नी ज्योती, मुलगा वैभव व मुलगी राणी सोबत वास्तव्याला होते. समाधान कुंभार हे ममुराबाद शिवारात वीटभट्टीचा व्यवसाय करत होते. अनेक वर्षांपासून ते हा व्यवसाय करत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून, तालुका पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, विकास शिंदे हे पुढील तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिस स्टेशनचे विकास शिंदे, माणिक सपकाळे यांच्यासह इतर कर्मचायांनी गावातील पट्टीच्या पोहणाऱ्यांना आणले. त्यानंतर विहिरीतून मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, विहिरीत पाणी भरपूर असल्याने सहा तासांचे प्रयत्न करूनही मृतदेह हाती लागत नव्हता. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास विहिरीत मृतदेह आढळला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरा समाधान कुंभार यांच्यावर ममुराबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    February 26, 2026

    तरुण मामीचा सख्ख्या भाच्याने केला विनयभंग ; गुन्हा दाखल !

    February 26, 2026

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.