जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात नियमित सुरु असलेल्या दुचाकी चोरीचे सत्र सुरूच होते. याचा तपास प्रत्येक पोलीस स्थानकात जरी असला तरी स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल २६ दुचाकीसह चोरट्याला आज ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव रोड भडगाव येथील एका साई अँटो बजाज शो रुममधील तब्बल ३० दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या गुन्हाच तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे आल्याने पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना गुप्त बातमी मिळाली त्यांनी लागलीच आपले पथक जावून साई ॲटो बजाज शो रूम चे मालक यांना त्यांचे कडील स्टॉक बाबत विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे स्टॉक मधुन १४ पल्सर मोटार सायकल व १६ प्लॅटीना मोटार सायकल असे एकुण ३० मोटार सायकल २२,७७,९८०/- रु. किंमतीच्या कमी असल्या बाबत कळविले त्यावर वरील पथकाने शो रुम मधील स्टाफ यांची विचारपुस करून संशयीत शोएब खान रऊफ खान, रा.नगरदेवळा ता.पाचोरा यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सदर शो रुम मधून साधारण तीन महिन्या पासून वेळोवेळी जशी संधी मिळेल असे १-१ मोटार सायकल बाहेर काढून इतरांना कमी पैश्यात विकत होता. तरी त्यास अजुन विश्वासात घेवून त्याने ज्या व्यक्तींना विकलेल्या आहेत अश्या व्यक्तींना निष्पन्न करीत आहोत. त्यांचे कडून ११ पल्सर मोटार सायकल व १५ प्लॅटीना मोटार सायकल असे एकुण २६ मोटार सायकल १९,५८,१३९/- रु. किंमतीच्या मोटार सायकल ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपासकामी भडगाव पोलीस स्टेशन गुरनं १७१/ २०२३ भादवि कलम ३८० या गुन्ह्यात आरोपी व मो.सा. हे पुढील तपास कामी देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, पोलीस उप निरीक्षक, गणेश वाघमारे, पोह विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, संदिप सावळे, जयंत चौधरी, विजय पाटील, राहुल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकुर, मोतीलाल चौधरी, अनिल जाधव, नितीन बावीस्कर, श्रीकृष्ण देशमुख, हेमंत पाटील, राहुल बैसाणे, महेश पाटील, अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.