नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार सुरु झाला असून यात झालेल्या गोळीबारात ९ जणाचा दुर्देवी मृत्यू झाला असल्याचेही सांगण्यात आले आहे. इम्फाळ पूर्वेकडील खमेनलोक भागात सकाळी झालेल्या ताज्या हिंसाचारात 9 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. शवविच्छेदन प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती एसपी शिवकांता सिंग यांनी दिली आहे.
मणिपूरमध्ये हिंसाचार होण्याचे सत्र सुरुच आहे. अज्ञात हल्लेखोरांनी चर्चमध्ये गोळीबार केला आहे. या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना सध्या इंफाळ येथील राज मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत कुकी दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
रात्री 10 ते 10:30 च्या दरम्यान मोठ्या संख्येने सशस्त्र हल्लेखोरांनी कुकी गावात हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी येथे गोळीबार झाला. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले आहे. मृत्यू झालेले सर्व जण मेईतेई समुदायाचे असल्याचे बोलले जात आहे. पाच दिवसांपूर्वी अज्ञात हल्लेखोरांनी मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यातील कुकी गावात हल्ला केला होता. या हल्ल्यात एका वृद्ध महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये एका ६७ वर्षीय महिलेचाही समावेश होता. दरम्यान, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने मणिपूर सरकारने अधिसूचित केलेल्या जातीय हिंसाचाराच्या सहा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे.