Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चोरट्यांनी फोडले दुचाकी शोरूम अन लांबविल्या ३० दुचाकी !
    क्राईम

    चोरट्यांनी फोडले दुचाकी शोरूम अन लांबविल्या ३० दुचाकी !

    editor deskBy editor deskJune 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी 

    चाळीसगाव रोडवरील साई ऑटो सेंटर येथून ३० नव्या दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली आहे. ही घटना शोरुममधील स्टॉक रजिस्टर तपासल्यानंतर उघडकीस आली असून एकूण २३ लाख रुपये किंमतीच्या मोटारसायकल चोरी झालेल्या आहेत. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ऑटो सेंटरचे संचालक रावसाहेब केशव पाटील (भडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नेहमीप्रमाणे दररोज सकाळी १० वाजता शोरुमला जावून कामावर देखरेख तसेच दुचाकी वाहनांच्या विक्रीबाबत तपशिलाची माहिती घेतली जाते. दि. ११ जून रोजी दुपारी ३ वाजेनंतर शोरुमचे व्यवस्थापक महेश लोटन पाटील तसेच रविकांत पाटील यांनी शोरुममधील दुचाकी वाहनांच्या स्टॉकची पडताळणी केली असता काही दुचाकी कमी असल्याचे आढळून आले. अधिक तपासणी केली असता ३० दुचाकी कमी असल्याचे दिसून आले. अज्ञाताविरूध्द भा. दं. वि कलम ३८०प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. नितीन रावते, पोहेकॉ विलास पाटील, पोहेकॉ. विजय जाधव, पोलीस कान्स्टेबल स्वप्नील चव्हाण हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    February 26, 2026

    बँकेतून काढले १० लाख; पंक्चरदरम्यान ८ लाखांवर चोरट्यांचा डाव !

    February 26, 2026

    ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.