जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून वाळू माफियांचा धुमाकूळ सुरु असतांना महसूल अधिकारी आता ॲक्शन मोडवर येत मोठी कारवाई केल्याने वाळूमाफियांची मोठी धांदल उडाली आहे. महसूल अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवून असणारे नेहमीच कारवाईपासून बचाव करणाऱ्या वाळू माफियांच्या रेकीला चकवा देत महसूल प्रशासनाने मोठा प्लान करीत गिरणा नदीपात्रातून अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या १२ वाहनांवर कारवाई केली. यामध्ये ७ डंपर व ५ ट्रॅक्टर जमा करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महसूल प्रशास गेल्या आठवडाभरात अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. गेल्या आठवड्यात जळगाव तालुक्यातील खेडी या गावातून २०० ब्रास वाळूचा साठा जप्त केल्यानंतर सोमवारी रात्री १० वाजता महसूल प्रशासनाच्या पथकाने आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रातून ७ वाळूचे डंपर व ५ ट्रॅक्टर जमा केले आहेत. नेहमीच महसूलच्या अधिकारी, तलाठ्यांवर लक्ष ठेवून वाळू माफियांची रेकीची यंत्रणा महसूल प्रशासनाचे पथक नदीपात्रात पोहचण्याच्या आधीच सर्व वाहनं काढून घेत होती. मात्र, महसूल विभागाने आता वाळू माफियांच्या रेकी करणाऱ्या यंत्रणेला चकमा देत थेट नदीपात्रात जावून सर्वात मोठी कारवाई केली आहे. अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, प्रांताधिकारी महेश सुधळकर, तहसीलदार नामदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूलच्या पथकाने ही कारवाई केली.
यामध्ये देवेंद्र चंदनकर, राहुल वाघ, अतुल जोशी, छाया कोळी, महेश कोळी यांच्यासह इतरांचा या पथकात समावेश होता. रात्री १० वाजेच्या सुमारास आव्हाणे येथील गिरणा पात्रात उतरून ही कारवाई केली आहे. अनधिकृत वाळू उपसा सुरु १ असताना, वाळू माफियांकडून तहसीलदार, प्रांत, सर्कल अधिकारी, यांच्यावर नजर ठेवली जाते. सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या ‘यांनी आपल्या तहसीलदार नामदेव पा सुमारास कार्यालयातील महत्त्वाच्या फाईली शासकीय वाहनात ठेवत ते वाहन पुढे रवाना केले, मात्र त्या वाहनात तहसीलदार बसले नाहीत. वाळू माफियांसाठी रेकी करणाऱ्यांकडून कोणताही निरोप नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्यांसाठी गेला नाही, कारण तहसीलदार हे कार्यालयातच होते. त्यानंतर तहसीलदारांच्या गाडीमध्ये महसूलच्या इतर कर्मचाऱ्यांना रवाना करून, थेट हे वाहन आव्हाणे येथे पाठविण्यात आले. त्यामुळे वाळू माफियांसाठी रेकी करणाऱ्यांकडून नदीपात्रातील वाहनधारकांकडे माहिती जाईल व पळ काडतील तोपर्यंत पथक पोहचल्यामुळे ७ डंपर व ५ ट्रॅक्टर जमा करण्यात आले होते. त्यानंतर मोटारसायकलव्दारे तहसीलदार नामदेव पाटील कारवाईच्या ठिकाणी पोहचले.