जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून चेतन प्रकाश चौधरी (वय २३) या तरुणाला चार जणांनी बेदम मारहाण करून विषारी औषध पाजल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू असताना रात्री आठ वाजता मृत्यू झाला होता. याप्रकरणी मंगळवारी तरूणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चौघही संशयितांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी चेतन याला सचिन कैलास चव्हाण (२३), तुषार उर्फ सोन्या विजय पाटील (२४), सनी उर्फ फौजी बाळकिशन जाधव (३६), कुंदन रवींद्र पाटील (३०, रा. रामेश्वर कॉलनी) यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून बेदम मारहाण केली होती. नंतर विषारी औषध पाजून गल्लीमध्ये सोडून दिले होते. मुलाला मारहाण झाल्याचे कळाल्यानंतर प्रकाश चौधरी यांनी लागलीच रामेश्वर कॉलनी गाठून मुलाला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मात्र, रात्री ८ वाजता चेतन याची उपचारादरम्यान प्राणज्योत मा. मंगळवारी एमआयडीसी मालवली. मंगळवारी एमआयडीसी पोलिसात प्रकाश चौधरी यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणा-या चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला.
गुन्ह्यातील आरोपी हे रामेश्वर कॉलनीमध्ये असल्याची माहिती दुपारी पोि निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी लागलीच पोलिसांचे पथक करून त्यांना कारवाईच्या सूचना केल्या. पथक रामेश्वर कॉलनीमध्ये पोहोचताच संशयित पोलिसांचे वाहन पाहताच पळू लागले. मात्र, त्यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक जगदाळे, आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील, पंकज पाटील, छगन तायडे, ईश्वर भालेराव, चंद्रकांत पाटील, ललित नारखेडे, इम्तीयाज खान आदींच्या पथकाने केली आहे.