जळगाव : प्रतिनिधी
भुसावळ शहरातील सावळे नगर परिसरातील एका तरुणाला गावठी पिस्तूल घेऊन फिरताना स्थानिक गुन्हे पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले आहे. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना माहिती मिळाली होती. भुसावळ शहरात सावळेनगरमध्ये संशयित सागर बबन हुसळे हा फेकरी शिवारात झेटीएस भागात गावठी पिस्तुल घेवून येणार आहे. पथकातील पोलीस अंमलदार यांनी भुसावळ शहरात फेकरी शिवारात झेटीएस भागात नमुद इसमाची माहीती काढता तो पाण्याचे टाकी जवळ असल्याची माहीती मिळाली. पथकाने संशयित इसमावर छापा टाकुन त्यास ताब्यात घेत नांव गाव विचारता त्याचे नांव सागर बबन हुसळे (वय २६, रा. भगवान सावळे नगर, भुसावळ) असे सांगीतले. त्याची अंगझडती घेता त्याचे कब्यात २० हजार रुपये किमतीची एक गावठी लोखंडी पिस्तुल मॅग्झीनसह मिळून आल्याने ते जागीच जप्त करून ताब्यात घेण्यात आले. त्याचे विरुध्द भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत सहायक फौजदार रवि नरवाडे, पोना रणजित जाधव, पोना श्रीकृष्णा देशमुख, चापोका प्रमोद ठाकूर यांनी सहभाग घेतला.