प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव तालुक्यातील मौजे वंजारी येथे आत्मा अंतर्गत खान्देशी शेतकरी गट स्थापन करण्यात आला. सदरील गटातील शेतकऱ्यांना लाल भेंडी पिकाविषयी आत्मा बिटीएम दीपक नागपुरे यांनी मार्गदर्शन केले. लालभेंडी पिक व्यवस्थापन व विक्री बाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदरील गटातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन नाविन्यपूर्ण भाजीपाला लागवड व भाजीपाला हातविक्री करून जास्त नफा मिळवावा, असे आव्हान करण्यात आले. ॲडव्हान्टा कंपनीच्या ‘कुमकुम लाल भेंडी’ प्रात्यक्षिक क्षेत्रास भेट प्रसंगी बिटीएम आत्मा दीपक नागपुरे, कृषी सहाय्यक किरण वायसे, योगेश काकडे, रामकृष्ण पाटील उपस्थित होते.
शेतकऱ्यांना ५०% अनुदानावर हरभरा व ज्वारी बियाणे उपलब्ध होणार आहे. कृषी विभागामार्फत बियाणे वाटप पिंप्री येथे कैलास ऍग्रो व जाज ऍग्रो, पाळधी येथे अण्णासाहेब साहेबराव पाटील फ्रुटसेल सोसायटी, धरणगाव येथे शाह ऍग्रो व प्रविण कुमार येवले यांच्या दुकानावर उपलब्ध असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी ७/१२ उतारा व आधार कार्ड ची झेरॉक्स सोबत न्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी किरण देसले यांनी केले आहे.