जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील जळके येथील बसस्थानक परिसरातील कृष्णा ज्वेलर्स रात्री १२ते२:१५च्या सुमारास चोरट्यांनी फोडल्याची घटना सकाळी उघडकीस आली या घटनेची माहिती आज सकाळी ५:१५च्या सुमारास वसंतवाडी गावाचे सरपंच विनोद पाटील यांनी जळके पोलिस पाटील संजय चिमणकारे यांना तसेच कृष्णा ज्वेलर्सचे मालक मनोज पाटील यांना दुरध्वनी द्वारे त्याचं दुकानाचे शटर व चॅनल उघडे असुन चोरी झाल्याचे दिसून येत आहे असे सांगितले माहिती मिळताच कृष्णा ज्वेलर्सचे मालक मनोज पाटील हे आपल्या दुकानावर आले त्यांनी दुकानावर येऊन दुकानाची स्थिती पाहिली त्यांना दुकानात चोरी झाल्याची खात्री झाली त्यांच्या दुकानातील लोखंडाच्या तिजोरीसह चोरट्यांनी सुमारे २४००ग्रॅम वजनाचे चांदी अंदाजीत किंमत २१५०००व १००००रुपये रोकड तसेच दुकानातील सीसीटीव्ही फुटेजचे सि प्लस कंपनीचे डी.व्ही.आर किंमत १००००रुपये असे अवज चोरट्यांनी लांबवले या घटनेची माहिती जळके पोलिस पाटील संजय चिमणकारे यांनी औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशन जळगाव यांना कळविली त्यांनंतर म्हसावद येथील पोलिस चौकशीला असलेले हे.कॉ.आबा महाजन व पो.कॉ.बच्छाव हे घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाची पाहणी केली व सदर घटनेची माहिती औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना कळविली माहिती मिळताच पोलिस निरीक्षक जयपाल हिरे हे आपल्या वरिष्ठ जिल्हा पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांच्यासह घटना स्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळ व परिसराची पाहणी केली त्यावेळी कृष्णा ज्वेलर्स येथे यापूर्वी ही दोन वेळा चोरी झाल्याचे समोर आले आहे. घटना स्थळी वरिष्ठांसह औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनच्या डी बी विभागाचे अतुल वंजारी व कर्मचारी उपस्थित होते.
कृष्णा ज्वेलर्सचे मालक मनोज पाटील यांनी औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर घटना स्थळी डॉग पथक,ठसे तज्ञ व फॉरेन्सिक लॅबची टीम घटनास्थळी दाखल झाली यावरून तपासाचे चक्र गतिमान केल्याचे दिसून येत आहे असे नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे व लवकर चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिस यंत्रणेला येईल असा आशावाद व्यक्त होत आहे