अमळनेर : प्रतिनिधी
शहरात गेल्या दोन दिवसाआधी अल्पवयीन मुलामध्ये दोन गटात जोरदार हाणामारी झाली होती. यानंतर प्रशासनाने दोन दिवसाची संचार बंदी लागू करण्यात आली होती. ओट्यावर व्हिडिओ पाहणार्या तरुणांना हटकल्याच्या वादातून दोन गटात शहरात मोठी दंगल उसळली होती. दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक करण्यात आल्यानंतर ईरफान जहुर बेलदार या संशयिताने तलवारीने सहा.निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांच्यावर वार केला मात्र सुदैवाने वार चुकण्यात यश आले असलेतरी पायाला तलवार लागल्याने परदेशी यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. या प्रकरणी दोन्ही गटातील 61 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही गटातील 29 जणांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना शनिवार, 10 रोजी अमळनेर न्यायालयात हजर केले असता न्या.यलमाने यांनी 11 आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर उर्वरीत 18 आरोपींना पोलीस कोठडीचा हक्क राखून ठेवत न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
शनिवारी रात्री उशिरा अमळनेर पोलिसांनी दंगल प्रकरणी मोहसीन खान सलीम खान (30) व मोहम्मद मसुद अब्दुल हमीद (38, दोन्ही रा.जिनगर गल्ली, अमळनेर) यांना अटक करण्यात आली. दरम्यान, अटकेतील आरोपींची संख्या आता 31 झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री दहा वाजता शहरात झालेल्या दगडफेकीनंतर अमळनेर शहरात शनिवार, 10 जून रोजी सकाळी 11 ते रविवार, 12 जून रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.