नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बिपरजॉय चक्रीवादाळ सुरु असतांना वाऱ्याचा वेग ताशी १७५ किलोमीटरहून अधिक आहे. त्यामुळे बिपरजॉय चक्रीवादळाने रुद्र अवतार धारण केले आहे. तर या वादळाचा फटका पाकिस्तानला बसला आहे. या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 34 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच 145 जण वादळाच्या तडाख्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याने पाकिस्तानात कहर केला. त्यामुळे 34 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 80 घरांचेही नुकसान झाले आहे. खैबर पख्तूनख्वाच्या बन्नू, डेरा इस्माईल खान, करक आणि लक्की मारवत येथे मोठे नुकसान झाल्याची माहिती पाकिस्तान प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.
कोणत्याही अनुचित घटनेला सामोरे जाण्यासाठी खैबर पख्तूनख्वामधील सर्व 1122 केंद्रांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. शोध आणि बचाव कार्य सुरू असून सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत आहे. प्रशासनाने या दुर्घटनेत पुनर्वसन आणि मदत कार्यांसाठी 40 दशलक्ष रुपये जारी केले आहेत. वादळाच्या तीव्रतेने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.