Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव वाळू ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार !
    क्राईम

    भरधाव वाळू ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार !

    editor deskBy editor deskJune 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी 

    जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून नेहमी चर्चेचा विषय असलेल्या वाळूमाफियांनी पुन्हा एकदा पायी जाणाऱ्या तरुणाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. हि घटना चोपडा तालुक्यात घडली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, वाळूने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने पायी चालणार्‍या ३० वर्षीय तरुणास धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू ओढवला. हा अपघात रविवारी सकाळी 11 च्या सुमारास अडावद कृषी विद्यालयाजवळ घडला. या अपघातात चोपडा तालुक्यातील कमळगाव येथील राजेंद्र झिंगा धनगर या तरुणाचा मृत्यू ओढवला. रााजेंद हा तरुण अडावद-चोपडा मार्गावरील कृषी विद्यालयाजवळ पायी चालत असताना वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने राजेंद्र यास जबर धडक दिली. यात त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक रवींद्र विजय कोळी (29, रा. सुटकार ता. चोपडा) यास वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत राजेंद्र धनगर याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जेवणासाठी उतरले… अन् एसटी बस पेटली : ५० प्रवासी थोडक्यात बचावले

    March 11, 2026

    दक्षता पेट्रोलपंप घोटाळा : उपनिरीक्षक वाघांकडून मुलाच्या खात्यात 10 लाख; सोन्याची खरेदी उघड

    March 11, 2026

    चार वर्षीय चिमुकलीवर मामाने केला अत्याचार : संतप्त जमावाने रोखला महामार्ग !

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.