प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील जयहिंद व्यायाम शाळा व नवयुवक दुर्गा माता मित्र मंडळ यांच्या वतीने पांडव सभेचे वाहन उत्सव निमित्त लहान माळी वाडा परिसर येथे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी स्पर्धेत जवळ पास 121 स्पर्धक सहभागी झाले होते. काल रात्री एका छोटेखानी कार्यक्रमात रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
त्याप्रसंगी श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळ चे अध्यक्ष डी. आर. पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, मंडळाचे सदस्य चंदु अण्णा, कडू महाजन, पांडुरंग मराठे, रघुनाथ चौधरी तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष सुनिल चौधरी, धनपा चे उपनगराध्यक्ष विलास महाजन, बालाजी पंतसंस्थेचे व्यवस्थापक राजेद्र महाजन, पर्यवेक्षक महाजन सर आदी उपस्थित होते. प्रारंभी आयोजकांचा वतीने प्रमुख पाहुण्याचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर रांगोळी स्पर्धेचे परीक्षक प. रा. विद्यालय चे महाजन सर यांनी निकाल घोषित केला. त्यात प्रथम बक्षीस शितल भागवत मराठे, द्वितीय बक्षीस कृष्णा दिलीप महाजन, तृतीय बक्षीस मयुरी रमेश महाजन आणि उत्तेजनार्थ बक्षीस खुशी ज्ञानेश्वर चौधरी व कीर्ती दिलीप महाजन यांना ट्राफी, प्रशस्तीपत्रक देण्यात आले. तसेच धनपा चे उपनगराध्यक्ष कल्पनाताई महाजन यांचा कडून विलास महाजन यांनी प्रत्येक विजेत्याला 200 रुपयांचे रोख बक्षीस देखील देण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी डी. आर. पाटील सर व गुलाबराव वाघ यांनी आपल्या मनोगतातून विजयी स्पर्धकांचे अभिनंदन करून या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांना आपण सर्वांनी तळमळीने भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करण्यात मोठे योगदान दिल्याचे नमुद करून स्पर्धेत ज्यांना बक्षीस मिळाले नसेल त्यांचा ही गुणगौरव करून भविष्यात आपण यशस्वी व्हाल अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाचे सहसचिव प्रशांत वाणी यांनी केले तर आभार गोपाळ पाटील यांनी मानले. स्पर्धकांना सर्व बक्षिसे जयहिंद व्यायाम शाळेचे व्यवस्थापक किशोर पहेलवान यांचा कडून देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू महाजन, गणेशबापु पाटील, दिलीप महाजन, पंकज पाटील, मुन्ना पाटील, दादु पाटील, हरीष महाजन, समाधान पाटील, गोपाल पाटील, दिपक पाटील यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.