Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महामार्गावर भीषण अपघात ; १ महिलेसह तीन जण ठार !
    क्राईम

    महामार्गावर भीषण अपघात ; १ महिलेसह तीन जण ठार !

    editor deskBy editor deskJune 12, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था 

    राज्यात सर्वात मोठा महामार्ग असलेल्या समृद्धी महामार्गावर नेहमीच अपघाताची मालिका सुरु असून आता पुन्ह्या एकदा मुंबईहून समृद्धी महामार्गाने शिर्डीला परतत असताना भरधाव कार दुभाजकाला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले आहेत हि घटना दि ११ रविवारी रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास सिन्नरच्या हद्दीत ही घटना घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नरजवळील खंबाळे शिवारात झालेल्या या भीषण अपघातात शिर्डी येथील चौघेजण ठार झाले आहेत. त्यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हज यात्रेकरूंना सोडून हे सर्वजण शिर्डीला परतत होते. अपघातात चौघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. सिन्नर हद्दीतील हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर खंबाळे शिवारात घोटी बाजूकडून शिर्डी बाजूकडे जाणारी अति वेगात असलेल्या इन्होवा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षण भिंतीवर जावून आदळली. या अपघातात रज्जाक अहमद शेख (वय ५५), सत्तार शेखलाल शेख (वय ६५), सुलताना सत्तार शेख‌‌ (वय ५०) हे जागीच ठार झाले.‌ तर, फैयाज दगुभाई शेख (वय ४०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जुबेर रज्जाक शेख (वय ३५), मैरूनिसा रज्जाक शेख (वय ४५), अझर बालन शेख (वय २५) मुस्कान अजहर शेख (वय २२) हे गंभीर जखमी झाले. यातील काही जखमी शिर्डी येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल तर काही नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहेत. मयत आणि जखमी सर्व शिर्डी येथील रहिवासी असून एकमेकांचे नातलग आहेत.
    पोलिस उपअधीक्षक प्रदीप मौराळे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलिस सिन्नर केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी, महाराष्ट्र सुरक्षा पथक, जलद प्रतिसाद पथक समृध्दी महामार्ग यांनी जलद घटनास्थळी जात इनोव्हा कारचे दरवाजे कटरने कापून मयत आणि जखमींना कारमधून बाहेर काढले. मयतांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात तर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या साह्याने उपचारासाठी रवाना करण्यात आले. अपघात ग्रस्त वाहन घटनास्थळावरून हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    धक्कादायक : प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. शेख यांच्या धारदार शस्त्राने हल्ला !

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.