• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चारचाकीच्या भीषण अपघातात अमळनेरातील तीन ठार तर चार जखमी !

editor desk by editor desk
June 10, 2023
in अमळनेर, क्राईम
0
चारचाकीच्या भीषण अपघातात अमळनेरातील तीन ठार तर चार जखमी !

अमळनेर : प्रतिनिधी 

नाशिक येथून गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून कारने परतणाऱ्या पाटील परिवार काळाने घाला घातला. त्यांची कार पुलाखाली कोसळून दहा वर्षाच्या मुलासह तिघे ठार झाले. तर चार जण जखमी झाले. शुक्रवार हा त्यांच्यासाठी घातवार ठरला. हा भीषण अपघात शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास नवलनगरजवळ घडला. हा अपघात एवढा भीषण होता की अनेकांच्या अंगाचे थरकाप उडाला. या अपघातात सरलाबाई पंडीत पाटील (वय ४५), मीनाबाई राजेंद्र पाटील (वय ५०), व शाहू विजय पाटील (वय १०, सर्व रा.अमळनेर) यांचा मृत्यू झाला. नाशिक येथून गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून पाटील परिवार कारने (क्र.एमएच ०४-एफझेड३६८९) अमळनेरकडे येत होता.

कारमध्ये जवळपास सात ते आठ जण हाेते. वेगाने येणारी कार फागणे-अमळनेर रस्त्यावरील नवलनगर गावाजवळ असलेल्या एका मोरी पुलावरून खाली कोसळली. अपघात एवढा भीषण होता की, कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात कारमधील चार जण जखमी झाले आहेत. ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना रूग्णवाहिकेतून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक अनिल महाजन व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत धुळे तालुका पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. पाटील परिवाराच्या कुटुंबातील अन्य सदस्यांसह नातेवाइकांनी आणि हितचिंतकांनी रूग्णालयात गर्दी केली होती. अपघाताचे भीषण चित्र बघून नातेवाइकांनी हंबरडा फोडला. यामुळे या कुटुंबात मोठी शोककळा पसरली आहे.

Previous Post

अमळनेरात अल्पवयीन मुलामध्ये मारहाण ; एक दिवसाची संचारबंदी लागू !

Next Post

ब्रेकिंग : शरद पवारांनी भाकरी फिरवली !

Next Post
ब्रेकिंग : शरद पवारांनी भाकरी फिरवली !

ब्रेकिंग : शरद पवारांनी भाकरी फिरवली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group