Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महिलेची साडेचार लाखात फसवणूक
    क्राईम

    महिलेची साडेचार लाखात फसवणूक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 22, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:- लातूर येथील  रिमार्ट शॉपी नावाच्या कंपनीच्या मालकाने यावल येथील 25 वर्षीय युवतीला 999  ब्रॉण्ड बाजार” या नावाने रिटेल शॉपी इलेक्ट्रिक व होम अपलायन्सेस वस्तू विक्री करण्याच्या नावाखाली सुमारे साडेचार लाख रूपयांमध्ये फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत माहिती अशी की, शुभांगी जुगल पाटील (वय-२५)  रा. गवत बाजार मेनरोड यावल ह्या गृहिणी महिला आहे. दरम्यान त्यांनी रिमार्ट शॉपी कंपनी चे मालक विलास मोतीराम राठोड (वय-४५) रा. अंबेजोगाई रोड ता. रेणापूर जि. लातूर यांनी “999  ब्रॉण्ड बाजार” या नावाने रिटेल शॉपी इलेक्ट्रिक व होम अपलायन्सेस वस्तू विक्री करण्याकरीता शुभांगी पाटील यांच्याशी संपर्क केला. त्यानुसार महिलेने राठोड यांच्या सांगण्यावरून वेळोवेळी साडे चार लाख रूपये दिलेल्या बँक अकाऊंटमध्ये जमा केले. तरी देखील राठोड नामक व्यक्तीने कोणत्याची पध्दतीचा मोबदला दिलेला नाही. किंवा पैसे परत केले नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने यावल पोलीसात धाव घेतली. महिलेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विलास राठोड याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अजमल खान पठाण करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.