चोपडा : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ सुरु असतांना अडावद पोलिसांनी केलल्या कारवाईत 4 संशयित आरोपीसह तब्बल 14 दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसारए जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्या अडावदचे सपोनि गणेश बुवा व स्टाफ यांनी पेट्रोलींग दरम्यान चार संशयित ईसमाना दोन विना क्रमांकाचे मो.सा.सह पकडले असता त्यांची शाहानिशा केली असता त्यांचे ताब्यातील युनिकॉर्न गाडी ही अडावद येथील पुष्पा रेसिडेंसी येथुन चोरी केले बाबत कबुल केले त्यावरून सदर युनिकॉर्नचा चेसेच नंबर व इंजिन नंबर पाहुन खात्री करता ती अडावद पो.स्टे. गु.र.न.33 / 2023 भा.द.वि.क. 379 प्रमाणे दाखल गुन्हयातील असले बाबत खात्री केली तद्नंतर सदर आरोपीतांना विश्वासात घेवुन विचारपुस केली त्या आरोपीतांनी चोपडा श पो.स्टे.धरणगाव,यावल,एरंडोल येथुन मोसा. चोरी करुन आणल्या बाबत कबुली दिली असुन आरोपीतां कडुन एकुण 14 वेगवेगळया कंपणीच्या मोसा. हस्तगत करण्यात आल्या असुन त्यापैकी धरणगाव पो.स्टे.1)गु.र.न.188/2023, 2)189/2023 भा.द.वि.क. 379 प्रमाणे, तसेच चोपड़ा शहर पोस्टे गूरनं.3)441/2022, 4)76/2023 भादवी क. 379 प्रमाणे, यावल पोस्टे 5)गूरनं. 273 / 2023 भादवी क.379 प्रमाणे दाखल गुन्हयातील असुन ईतर मोसा.च्या मालकाचा पत्ता प्राप्त करून संबंधीत पो.स्टे ला संपर्क करून ईतर पो.स्टे. चे गुन्हे उघडकीस आणन्याचा प्रयत्न करीत आहोत. तरी सदर आरोपीत नामे 1) राजेश श्रीराम बारेला वय 25 रा. चांदसणी 2) मूकेश आबा बारेला वय 23 रा. बोराअजंटी ता. चोपडा 3) विजय श्रीराम बारेला वय 23 रा. धूलकूट ता. बडवाणी 4) आकाश वसंत सोनवणे (भिल) वय19 रा. रामपूरा चोपडा यांना सदर अडावद पोस्टे कडील गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे तसेच सहा. पोलीस अधिक्षक ऋषिकेश रावले, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. श्री गणेश बूवा सो व पोउपनिरी. चंद्रकांत पाटील, पोउपनिरी. जगदीश कोळंबे, सफी. शरीफ तडवी, पोना. जयदीप राजपूत, पोहेकाँ. सूनिल तायडे, पोना. कैलास बाविस्कर, पोहेकाँ. सपकाळे, पोहेकाँ मूकेश तडवी, पोकाँ. सतिष भोई, पोना. किरण शिरसाठ, पोना विनोद धनगर, पोकाँ प्रदीप पाटील पोकाँ. अक्षय पाटील यांनी केली आहे. तरी अडावद पोस्टे कडून नागरीकाना आव्हान करण्यात येते कि, सदर मो.सा. बाबत काहीही माहीती मिळाल्यास अडावद पोस्टेशी संपर्क साधावा हि विनंती.