Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लग्न धुमधडाक्यात झालं मुलीला हनिमूनच्या वेळी बसला धक्का !
    क्राईम

    लग्न धुमधडाक्यात झालं मुलीला हनिमूनच्या वेळी बसला धक्का !

    editor deskBy editor deskJune 10, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    प्रत्येक मुलीचे ज्यावेळेस लग्न ठरते त्यावेळेस ती स्वप्नातील राजकुमारासोबत स्वप्न रंगवत असते असेच एका मुलीचा लग्न ठरलं तेव्हा स्वप्नातला राजकुमार इंजिनिअर असल्याचं तिला सांगण्यात आलं. यानंतर लग्नही धुमधडाक्यात झालं आणि मुलगी माहेरहून सासरी गेली, पण सासरी आल्यानंतर या मुलीला धक्का बसला आणि तिने थेट पोलीस स्टेशन गाठलं.

    हे प्रकरण हरदोई जिल्ह्यातील आहे. हरदोईच्या कोतवाली भागातील मुलीचं लग्न 4 महिनेआधी शाहजहांपूरच्या शुभम त्रिपाठीसोबत झालं. हे लग्न हिंदू रितिरिवाजानुसार झालं, तसंच मुलीच्या वडिलांनी आयपतीप्रमाणे खर्चही केला एवढच नाही तर मुलाला हुंडाही दिला, असा दावा मुलीने आणि तिच्या माहेरच्यांनी केला आहे. लग्न झाल्यानंतर मुलगी शाहजहांपूरला सासरी आली तेव्हा हनिमूनच्या रात्री तिचा नवरा शुभम काहीतरी कारण सांगून बाहेर गेला.

    बरेच दिवस असंच चालत राहिलं. मुलीला संशय आल्यानंतर तिने शुभमला विचारलं तेव्हा शुभमनं दिलेलं उत्तर ऐकून मुलीच्या पायाखालची जमिनच सरकली. शुभमने त्याच्या बायकोला तो किन्नर असल्याचं सांगितलं. आपण ही गोष्ट शुभमच्या आईला सांगितली, पण सासूने मला त्यांचा दुसरा मुलगा अभिषेकसोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला.

    याला विरोध केल्यानंतर 23 मार्च 2023 ला सासू मीना, दीर अभिषेक, पती शुभम आणि मेव्हणा अलोक यांनी मारपीट केली आणि अभिषेकसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला, असा आरोप मुलीने केला आहे. मुलीने हा सगळा घटनाक्रम तिच्या घरच्यांना फोन करून सांगितला. माहेरचे जेव्हा तिला घेण्यासाठी आले तेव्हा सासरच्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दागिने आणि पैशांसोबत फोटो काढले. तसंच तुझ्या भावाला आणि वडिलांना लूट आणि 376 च्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकीही दिली, असा आरोप मुलीने केला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. पोलिसांनीही चौकशी करून योग्य प्रकारे कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.