Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ब्रेकिंग : राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी !
    राजकारण

    ब्रेकिंग : राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी !

    editor deskBy editor deskJune 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी वेगवेगळे वक्तव्य केल्याने त्यांना आता जीवे मागण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात तक्रार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘तुमचा देखील दाभोळकर करू’ अशी धमकी देण्यात आली आहे.

    ‘राजकारण महाराष्ट्राचं’ या नावाच्या खात्यावरुन अशा प्रकारची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्यासाठी गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना माहिती दिली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जेलभरो आंदोलन आहे. याच दरम्यान ही धमकी आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. सुप्रिया सुळे यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. एका सोशल मीडिया हँडवरुन अशा प्रकारची धमकी येते आणि त्यावर खाली विचित्र आणि दुर्दैवी कमेंट्स येतात, हे राज्यात काय सुरू आहे, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. मला सकाळी व्हॉटसअपवरुन या बाबदची माहिती मिळाली असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.