लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरा मध्ये प्रवेश करताना किंवा शहराबाहेर जाताना असलेला कालिंका माता ते तरसोद फाट्यापर्यंत च्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे हा रस्ता पंधरा दिवसात दुरुस्त न झाल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आज अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला.
भुसावळ वरून तरसोद फाट्यापर्यंत फोरवे झाला आहे मात्र तरसोद फाटा ते कालिंका मंदिर हा शहरात येणारा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे किंवा शहरातून बाहेर जाण्यासाठी मुख्य रस्ता असलेला कालिका माता मंदिर ते तरसोद फाटा हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला असून त्यावर खड़े जास्त झालेले आहेत. त्यामुळे रोजच्या अपघातांचे प्रमाण खूप वाढलेले आहेत. तरी सदर रस्ता येत्या १५ दिवसात पूर्णपणे दुरुस्त करण्यात यावा अन्यथा जळगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे गोदावरी इंजिनिअरींग कॉलेज जवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा जळगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सरचिटणीस . पंकज वासुदेव बोरोले यांच्यासह कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना एका निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.