• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चाळीसगाव : एकाच दिवशी दोन खून !

रात्री उशिरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
June 9, 2023
in क्राईम, चाळीसगाव
0
‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; तिघांविरुद्ध गुन्हा 

चाळीसगाव : प्रतिनिधी 

तालुक्यात एकाच दिवशी दोन खुनाच्या वेगवेगळ्या घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ निर्माण झाली. बुधवारी मध्यरात्री चिंचखेड शिवारात वृद्धाची लाकडी दांडक्याने निर्घृण हत्या करण्यात आली. त्यापाठोपाठ जामडी येथे गुरुवारी दुपारी तरुणाचा खून झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील ४५ वर्षीय राजेंद्र सुकदेव पाटील आणि जामडी येथील २५ वर्षीय तरूण तरबेज शहा याकूब शहा अशी खून झालेल्या इसमांची नावे आहेत. बुधवारी रात्री १० वाजता राजेंद्र पाटील हे झोपण्यासाठी शेतात गेले होते. मध्यरात्री अज्ञातांनी त्यांचा गळा दोरीने आवळून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच लाकडी दांडक्याने डोक्यात वार करून ठार मारले. गुरुवारी सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी दोरी व रक्ताने माखलेला लाकडी दांडा आढळून आला. याबाबत माहिती मिळताच मेहुणबारे पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण करीत आहेत. मुकेश पाटील (२३, रा. देवळी) याने याबाबत फिर्याद दिली. तालुक्यातील जामडी येथे गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तरुण फकीर तरबेज शहा याकूब शहा याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. हा तरुण एका ठिकाणी बसलेला असताना पाठीमागून एकाने त्याच्यावर सपासप वार केले. यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Previous Post

आनंद वार्ता : केरळात मान्सून दाखल !

Next Post

जळगाव पोलीस दलात खळबळ : अपर पोलिस अधीक्षकांच्या नावाने बनावट खाते !

Next Post
अखेर ‘त्या’ तमाशाच्या फडात नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल ; पोलीस कर्मचारी निलंबित

जळगाव पोलीस दलात खळबळ : अपर पोलिस अधीक्षकांच्या नावाने बनावट खाते !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group