• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बहीण भावाच्या नात्याला काळिमा : बहिण तीन महिन्याची गरोदर !

editor desk by editor desk
June 8, 2023
in क्राईम, राज्य
0
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

नागपूर : वृत्तसंस्था 

राज्यातील अनेक भागात महिलासह तरुणीवर अत्याचार होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असताना नागपुरात बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. चुलत भावाच्या वाढदिवसाला घरी गेलेल्या बहिणीवर तरुणाची नजर पडली. नात्याचा विचार न करता त्याने आपल्याच चुलत बहिणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. गर्भधारणेच्या ३ महिन्यांनंतर ही स्थिती उघड झाली. भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला कलंक लावणाऱ्या तरुणाविरुद्ध उमरेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी उमरेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावात राहते. ती इयत्ता ११ वीची विद्यार्थिनी आहे. तिचा चुलत काका तिच्या घराशेजारी राहतो. ती सतत त्यांचा घरी ये-जा करत असे. काकाचा मुलगा महेश्वर (27) बी.कॉमच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. तो त्याच्या चुलत बहिणीला १० वीपासून तिच्या अभ्यासात मदत करत होता. त्यामुळे ती नेहमी महेश्वरकडेच अभ्यास करत असे. एकत्र राहत असताना महेश्वरला तिच्यावर एकतर्फी प्रेम जळले होते. त्याने तिच्याकडे अनेकदा प्रेमाची मागणी केली. मात्र, आपण चुलत बहीण असल्याचे सांगून तिने त्याला वारंवार नाकारले. पण महेश्वरच्या नजरेतून ती हटत नव्हती. तो अनेकदा तिच्यासोबत अश्लील कृत्य करून बळजबरी करण्याचा प्रयत्न करत असे. तिने त्याकडे दुर्लक्ष केले.

महेश्वरचा वाढदिवस फेब्रुवारी महिन्यात होता. वाढदिवसाचा केक कापण्यासाठी त्याने रात्री ११ वाजता तिला घरी बोलावले. मध्यरात्रीनंतर कुटुंबीयांनी केक कापून महेश्वरचा वाढदिवस साजरा केला. रात्र झाल्यामुळे ती तिथेच थांबली होती. मध्यरात्रीनंतर महेश्वरने मुलीला शारीरिक संबंध करण्यास सांगितले. तिने नकार दिल्याने त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. 2 मे रोजी मुलीने आईकडे पोटात दुखत असल्याचे सांगितले. यानंतर दोघेही मायलेकी डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली, तेव्हा मुलगी तीन महिन्यांची गर्भवती होती. डॉक्टरांनी माहिती देताच तीच्या आईचे भान हरपले. चुलत भावाने शारीरिक संबंध ठेवले हे उघड होताच तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

जळगावातील सराईत गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई !

Next Post

आनंद वार्ता : केरळात मान्सून दाखल !

Next Post
आनंद वार्ता : केरळात मान्सून दाखल !

आनंद वार्ता : केरळात मान्सून दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group