• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादी चे अजून तीन उमेदवार बिनविरोध !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 21, 2021
in जळगाव, राजकारण
0
जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादी चे अजून तीन उमेदवार बिनविरोध !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आरोप पत्यारोप होत असताना छाननी पूर्वीच अर्ज दाखलच न झाल्याने शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादीचे एक असे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर यानंतर छाननीत अर्ज अवैध ठरल्याने राष्ट्रवादीचे अजून तीन उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार दिनांक १८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत होती.  धरणगाव प्राथमिक सहकारी सोसायटी मतदारसंघातून  संजय मुरलीधर पवार  तर, याच प्रमाणे पारोळ्यातून आमदार चिमणराव पाटील तर एरंडोलमधून त्यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांची देखील बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे. याबाबत अधिकृत घोषणा नंतर करण्यात येणार असली तरी महाविकास आघाडीच्या तीन जागा बिनविरोध आल्याने भाजपला धक्का बसला होता.

दरम्यान, यानंतर बुधवार दिनांक २० रोजी छाननी करण्यात आली. यात अनेक उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले होते. यात काही ठिकाणच्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. यात अमळनेरमधून माजी आमदार स्मिता वाघ यांचा अर्ज बाद झाला. याच प्रमाणे मुक्ताईनगर आणि बोदवड येथील उमेदवारांचे अर्ज देखील बाद झाले. यामुळे सोसायटी मतदारसंघातून अमळनेर येथून आमदार अनिल भाईदास पाटील तर बोदवडमधून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांची बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे. मुक्ताईनगरात फक्त एकनाथराव खडसे आणि त्यांची कन्या रोहिणीताई खडसे यांचेच अर्ज आहेत. यात रोहिणी खडसे अर्ज मागे घेऊन त्या महिला वर्गवारीतून निवडणूक लढविणार आहेत. यामुळे नाथाभाऊंचा विजय देखील निश्‍चीत झाला आहे.

दरम्यान, भुसावळ सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार संतोष चौधरी यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला असून तेथून नगराध्यक्ष रमण भोळे हे आमदार संजय सावकारे यांच्या विरोधात रिंगणात राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Previous Post

धरणगावात अभाविप तर्फे बांधकाम विभागाला निवेदन !

Next Post

तरसोद फाट्यापर्यंत रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा ; पंकज बोरोले

Next Post
तरसोद फाट्यापर्यंत रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा ; पंकज बोरोले

तरसोद फाट्यापर्यंत रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा ; पंकज बोरोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group