अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील गंगापुरी येथे बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी तीन घरांचा मागील दरवाजाच्या कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व लॅपटॉपसह किरकोळ रक्कम चोरून नेली. मात्र, चोरलेले लॅपटॉप आणि सोन्याची अंगठी तापी नदीच्या काठावर फेकून दिल्याचे समोर आले. त्यामुळे चोरटे नेमके कशाची चोरी करण्यास आले होते, हे समजू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी भीमराव रामोशे, गोरख कुमावत आणि अरुण पवार हे घराच्या बाहेर झोपलेले असताना घराचा मागील दरवाजाचा तोडून प्रवेश केला. भीमराव रामोशे यांच्या घरातून किरकोळ रक्कम वगळता, चोरट्यांचा हाती काहीलागले नाही. कुमावत यांच्या घरातून १ हजार ७०० रुपये चोरीस गेले, अरुण पवार यांच्या घरातून लॅपटाप सोन्याची अंगठी चोरली. मात्र ती तापी खोऱ्यात टाकल्याचे उघडकीस आले.