जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुनील झंवरला काल नाशिक येथून अटक करण्यात आली होती. झंवर आज न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था शाखा घोले रोड पुणेचे अवसायक जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला, योगेश साखला, विवेक ठाकरे, माहेश्वरी व इतरांनी एकमेकांच्या संगनमताने सदर पतसंस्थेच्या मालमत्ता बनावट वेबसाइट तयार करून गुप्त कटातील साथीदार सुनील झंवर व त्याच्या फर्मच्या नावे बेकायदेशीररित्या वर्ग करून पूर्ण मोबदला न देता ठेवीदारांच्या पावत्या ३० टक्क्याने विकत घेऊन त्यांच्या ७० टक्के रकमेचा व संस्थेच्या मालमत्तेचा अपहार केल्याचा आरोप आहे. दरम्यान, आज झंवरला न्यायालयात हजर केल्यानंतर विशेष सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांनी झंवरला जास्तीत जास्त दिवसांची पोलीस कोठडी मिळावी म्हणून जोरदार युक्तिवाद केला. त्यावर न्या. एन.एम.गोसावी यांनी झंवरला ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.