• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कोल्हापुरात पोलीस तैनात : पोलिसांनी केला लाठीचार्ज !

कोल्हापुरात दुकानासह घरावर दगडफेक

editor desk by editor desk
June 7, 2023
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
कोल्हापुरात पोलीस तैनात : पोलिसांनी केला लाठीचार्ज !

कोल्हापूर : वृत्तसंस्था 

राज्यातील कोल्हापूर शहरात काही तरुणांनी औरंगजेबाचे स्टेट्स ठेवल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.
दरम्यान, आक्षेपार्ह स्टेट्सविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज आंदोलन पुकारले. सकाळी 11 वाजेपासून शिवाजी चौक परिसरात हिंदूत्ववादी संघटनांनी एकत्र परिसर दणाणून सोडला. त्यानंतर शिवाजी चौक येथील गंजी गल्ली परिसरात काही आंदोलकांनी घरे, दुकानांवर दगडफेक केल्याची घटना घडली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. जमाव आक्रमक झाल्याने त्याला पांगवताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. सध्या कोल्हापूर शहरात एसआरपीएफ, दंगल काबू पथकासह सुमारे एक हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत स्वतः रस्त्यावर उतरून जमावास आवरण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोल्हापूर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. तसेच, आज (बुधवार) हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्यानुसार आज कोल्हापूर कडकडीत बंद आहे. हा बंद मागे घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने हिंदुत्ववादी संघटनांना केले आहे. परंतु हिंदुत्ववादी संघटना बंदवर ठाम आहेत. आज सकाळपासून शहरातील व्हिनस कॉर्नर परिसरासह अन्य ठिकाणी शुकशुकाट आहे. बस, रिक्षा सुरु आहेत.

काय घडली घटना !
जिल्हाबंदीचा आदेश लागू करताना प्रशासनाने म्हटले आहे की, लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे हद्दीतील काही तरुणांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे काही आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. त्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात अनपेक्षित घटना घडण्याचे नाकारता येत नसल्याने बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.

Previous Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर उत्साहात !

Next Post

हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू ; आरोपी अटकेत !

Next Post
जळगाव : चारचाकीवर दगडफेक करीत तरुणावर हल्ला !

हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू ; आरोपी अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group