जळगाव : प्रतिनिधी
जिल्हा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसा मिमित्त भव्य रक्तदान शिबीरांची सुरुवात शाररिक व्यंगाला न जुमानता विक्रमी दिव्यांग रक्तदाते मुकुंद गोसावी यांच्या स्वंयस्फूर्त रक्तदानाने करण्यात आली.
पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी याप्रसंगी सुरळीत रक्त साठा कमी झाला असून गंभीर पीडित रुग्ण, प्रसुती होणाऱ्या माता भगिनी यांना तसेच थेलेसिमिया हिमोफिलिया सिकलसेल रुग्णांना रक्ताची सदैव आवश्यकता असते याकरिता रुग्णांच्या नवजीवनसाठी रक्तदान केले पाहिजे. दिव्यांग रक्तदाते मुकुंद गोसावी यांच्या रक्तदान सेवा कार्याचे कौतुक करून रक्तदान कार्य ईश्वरीय सेवा असल्याचे सांगितले