जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका महिलेशी नंदुरबार येथील तरुणाने ओळख निर्माण करून तिच्याशी प्रेमसंबंध आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करून पीडितेने संबंध ठेवण्यास नकार दिल्यावर तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन तिला मारहाण आणि पैशांची मागणी करून अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार शहरातील दीपक देवानंद टाक (नंदुरबार) या तरुणाविरुद्ध रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात ३२ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासोबत रहायला आहे. तर नंदुरबार येथील दीपक देवानंद टाक हा विवाहितेच्या संपर्कात आल्यानंतर त्याने जवळीक वाढवून प्रेमसंबंध ठेवले व नंतर विवाहितेच्या घरी येत शारीरीक संबंध ठेवले. नंतर पीडीतेने संबंधास ठेवण्यास नकार दिल्यानंतर संशयित दीपकने आपले प्रेम संबंध असल्याचे सवार्वंना सांगण्याची धमकी देऊन वेळोवेळी पीडीतेच्या इच्छेविरुद्ध दोन वर्षापासून शारीरीक संबंध ठेवत अत्याचार केला तसेच पीडीतेसह तिच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण, शिवीगाळ करीत पैशाची मागणी केली. याबाबत विवाहितेने तक्रार दिल्यानंतर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील करीत आहेत.