Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रायगडावर शिवभक्तांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी !
    राजकारण

    रायगडावर शिवभक्तांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी !

    editor deskBy editor deskJune 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था 

    ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे दुर्गराज रायगडावर आयोजन करण्यात आले आहे पण यंदा भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या उत्साहाने रायगडावर येत आहेत.

    काही ठिकाणी तर विशेष गाड्या देखील सोडण्यात आल्या आहेत. मात्र या सगळ्या गोष्टी असल्या तरी काही भाविकांना मात्र गडावर जाता आलं नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भाविकांच्या गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी गडाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने ती नियंत्रणात आणणं हे देखील पोलीस प्रशासनासमोरचं आव्हान आहे.

    दुर्गराज रायगडावर सध्या जवळपास अडीच लाख भाविक जमले आहेत. गडाच्या खाली जवळपास ५०- ७५ हजार भाविक आहेत. इतके लोक गडावर सामावणे शक्य नसल्याने कृपया गडाखाली असलेल्या लोकांनी गड चढण्याची घाई करू नये असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे.सध्या गडावर असलेले लोक ९ – १० च्या दरम्यान गड उतरतील, त्यानंतर खाली असलेल्या लोकांना वरती सोडले जाईल. सर्व शिवभक्तांना महाराजांना अभिवादन करता येईल, तोपर्यंत मी गड उतार होणार नाही, याची शाश्वती मी देतो असं छत्रपती संभाजीराजे भाविकांशी बोलतना म्हणाले. वाहनांना गडापर्यंत जाण्यास पहाटेपासून पोलिसांचा मज्जाव केला आहे. त्यामुळे शिवभक्तांना माघारी फिरावं लागलं. गर्दी वाढू नये यासाठी रोप वे बंद केला आहे. रायगडावर लाखोंच्या संख्येनं शिवभक्त दाखल झाले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.