चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर नराधम बापाने अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या प्रकरणी आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावात मजुरी करणाऱ्या पीडित मुलीच्या आईला बरे वाटत नसल्याने सलाइन लावण्यासाठी घरात जागा नव्हती, म्हणून दिराच्या घरी आईला सलाईन लावण्यात आली. त्यावेळी बापाने पीडित मुलीचे तोंड दाबून तिच्याशी जबरदस्तीने अतिप्रसंग केला. रविवारी रात्री ११ वाजता आई घरी आल्यावर घाबरलेल्या मुलीने हा प्रकार सांगितला. याबाबत पोलिसात ५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस करीत आहेत.