जळगाव : प्रतिनिधी
शहरातून चोपडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बसने दुचाकीस्वाराला कट मारल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातून काही अंतरावर असलेल्या ममुराबाद रोडवरील रेणुका माता मंदिराजवळ दि ४ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास प्रमोद रघुनाथ बोरसे (वय ३६) हे पांडूरंग पाटील यांच्यासोबत दुचाकीने ममुराबादकडे जात असतांना एस.टी.बस.क्र.एम.एच.१४.बी.टी.२३६३ ने भरधाव येत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत दुचाकीस्वारांना कट मारल्याने यात दुचाकीसह दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे या प्रकरणी प्रमोद बोरसे यांनी जळगाव तालुका पोलिसात धाव घेत बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोना.कोळी हे करीत आहेत.