धरणगाव लक्ष्मण पाटील: येथील तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार यांना निवेदन देऊन पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर तसेच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि सततच्या वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे.
या संदर्भात धरणगाव तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने निषेध व्यक्त केला. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला देण्यात आला. निवेदन देतांना माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष धनराज माळी सर, जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, जेष्ठ नेते मोहननाना पाटील, तालुका कार्याध्यक्ष अरविंदआबा देवरे, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, किसान सभा अध्यक्ष शरद पाटील, युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे, विद्यार्थी उपाध्यक्ष वासुदेव सपकाळे, दिनेश पाटील, भूषण पाटील, अमर चव्हाण, प्रेमचंद चव्हाण, श्रीकांत साळुंखे आदि पदाधिकारी उपस्थित होते.