अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील अठरा वर्षीय तरुणीला पळवून नेण्याच्या प्लान तरुणीच्या सतर्कतेने व पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतल्याने त्या तरुणाचा प्लान फिस्कटला आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या मदतीने तरुणी सुखरूप घरी असल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील एका परिसरातील रहिवासी असलेल्या १८वर्षीय मुलगी दिनांक २ रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास तरुणी एका झेरॉक्स दुकानात गेली असता त्या ठिकाणी २१ ते २२ वर्षीय इसम येत इथे कलर प्रिंट निघेल का अशी विचारणा केली असता तेथूनच तरुणीवर काहीतरी भुरड टाकून व काहीतरी कारणास्तव शहरातील एका ठिकाणी तरुणीला घेऊन जात तिचे हातपाय बांधून ठेवत तरुणीच्या जवळ कॉलेज बॅगमध्ये मोबाईल असल्याने तरुणीने लागलीच पोलिसांना 112 क्रमांक डायल करीत सदर घटना सांगितली असता पोलिसांनी लागलीच घटनास्थळी येत तरुणीचे हातपाय बांधलेले पाहून तिची सुटका केली त्यानंतर तरुणीच्या वडिलांना फोन करीत घटनास्थळी बोलवून घेतले या तरुणीला अनोळखी इसमाने मारहाण देखील केली होती तिच्यावर औषधोपचार करण्यासाठी पोलिसांनी एका शहरातील डॉक्टरांच्या दवाखान्यात तिला दाखल केले आहे त्यानुसार तिचा जबाब सुद्धा घेण्यात आल्याची घटना अमळनेर शहरात घडली आहे याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे हे करीत आहे.