पाचोरा : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील एका गावात आपल्या चुलत बहिणीशी रात्रीच्या सुमारास भावाने चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव या गावातील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला शाळेच्या सुट्ट्या सुरू असल्याने अल्बम मुलगी आपल्या आजीच्या घरी आलेली असताना यावेळी अल्पवयीन मुलीचा चुलत भाऊ हा देखील या ठिकाणी होता त्या दिनांक पाच मे रोजी रात्रीच्या सुमारास या भावाने अल्पवयीन मुलगी झोपलेली असताना तिच्यासोबत चुकीचे कृत्य करीत गळा दाबून जबरदस्ती करण्याचा सुद्धा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहे.