जळगाव- आर्थिक अडचणीत असलेल्या मेव्हण्याला मदत करण्यासाठी शालकाने काम करत असलेल्या स्टेट बँकेत दरोडा टाकण्याचा कट रचला आणि तेथेच त्यांचा गेम फसला.शहरातील कालींका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेत १ दरोडा प्रकरणी पोलिसांनी संशयित तीन आरोपींना अटक केली असून त्यांनी कोणाची कबुली देत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली.
जुने जळगाव रस्त्यावरील कालींका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. १ जून गुरुवार सकाळी नऊ वाजता बँकचा नियमीतपणे कारभार सुरू झाला होता. साडेनऊच्या सुमारास दोन युवक दुचाकीवरून बँकेत आले. त्यांच्याकडे कोयत्यासारखे धारदार शस्त्र घेऊन बँकेत प्रवेश केला. शस्त्राच्या बळावर त्यांनी व्यवस्थापकासह पाच-सहा कर्मचार्यांना धमकावले. याप्रसंगी त्यांनी व्यवस्थापक राहुल महाजन यांच्या मांडीवर कोयत्याने वार करून बँकेतील रोकड व सोने लांबवून पलायन केले होते.
असा तपासाचा धागा गवसला..
पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी या बँक लुटीचा गुन्हा प्रकरणी शनिपेठ पोलिसांना सोबत घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवली. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी व आप्पासाहेब पवार, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचा या तपास पथकात होते. पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कालिका माता मंदिर शाखेचे व्यवस्थापक व बँकेच्या अन्य कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यावर सुगावा लागला. याच बँकेतील शिपाई मनोज सूर्यवंशी यांच्या जबाबतून संशय आल्याने त्याची कसून चौकशी पोलिसांनी केली आणि त्यातूनच तपासाचा धागा गवसला.
कर्जतला जाऊन आरोपींना घेतले ताब्यात
पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात म्हटले आहे की माझा मेव्हणा शंकर जासक निलंबित फौजदार, रायगड व त्याचे वडील रमेश जासक यांच्या संगनमताने आम्ही हा कट रचला होता. पोलिसांच्या पथकाने कर्जत येथे जाऊन निलंबित फौजदार शंकर जासक याला ताब्यात घेत जासक हा ऑक्टोबर २०२१ पासून नोकरीवर गैरहजर आहे. शंकर जासकच्या पत्नीचा भाऊ मनोज सूर्यवंशी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कालिंका माता मंदिर शाखेत करार तत्वावर शिपाई म्हणून काम करतो. या तिघांनी हा बँक लुटीचा कट रचला होता. जळगावातील बँक लुटीतील रक्कम आणि सोने पोलिसांनी कर्जत येथून जप्त केले आहे.