जळगाव : प्रतिनिधी
शहरातील खोटे नगर परिसरातील घराचा दरवाजा उघडा ठेऊन हॉलमध्ये झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने २० हजार रुपयांचा मोबाईल लांबविल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील खोटे नगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळील रहिवासी असलेले संदीप श्रावण साबळे (वय ४१) २ रोजी घराचा दरवाजा उघड ठेऊन झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या उशीजवळ असलेला २० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला . याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला संदीप साबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपस पोहेकॉ गुलाब माळी करीत आहे.