• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणाला रेल्वेचा धक्का लागून मृत्यू !

editor desk by editor desk
June 2, 2023
in क्राईम, जळगाव
0
तरुणाला रेल्वेचा धक्का लागून मृत्यू !

जळगाव  : प्रतिनिधी 

शिरसोली ते जळगाव दरम्यान धावत्या रेल्वेचा धक्का लागून हनुमाननगरातील व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. राजू किसन पवार (वय ४०, रा. चितोड, जि.धुळे ह.मु. हनुमाननगर) असे मृत व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघनगर हनुमाननगरात परिसरातील राजू पवार हे पत्नी व मुलासह वास्तव्याला होते. ते सेंट्रिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी रात्री पिंप्राळा येथील काम आटोपून ते घरी येण्यासाठी निघाले होते. शिरसोली ते जळगाव दरम्यानच्या रेल्वे खांबा (क्रमांक ४१५- २५ ते २७) च्या दरम्यान रेल्वेरूळ क्रॉस करत असताना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक हर्षल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. नंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. रात्री उशिरा रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गुरुवारी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात पत्नी मीनाबाई, मुलगा सुनील, एक भाऊ आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस नाईक हर्षल पाटील करीत आहेत.

Previous Post

महिलेच्या सोनसाखळी चोरणाऱ्यास रंगेहात पकडले !

Next Post

शेतकरीच्या किसान कार्डचा वापर करीत पैसे लांबविले !

Next Post
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !

शेतकरीच्या किसान कार्डचा वापर करीत पैसे लांबविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group