जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नेरी येथील एका ढाब्यासमोर जळगांव स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचार्यांनी गुरुवारी दुपारी गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांसह त्यांना पिस्तूल विकणाऱ्याला ताब्यात घेतले.
गजानन रामेश्वर भोई (१९, रा. श्रीकृष्ण नगर, नेरी) व शेखर राजेश सुके (१९, रा. कंडारी, ता.जळगांव) यांचेकडून ३० हजार किमतीचे पिस्तूल जप्त केले. त्यांनी पिस्तूल जामनेर येथील एकाकडून घेतली असल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक कारभारी बोरुडे करत आहेत.