Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मी फक्त सांगतो ते तिजोरी खोलून देतात ; मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान
    राजकारण

    मी फक्त सांगतो ते तिजोरी खोलून देतात ; मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान

    editor deskBy editor deskMay 31, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यातील अनेक जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासकामाचा धडाका सुरु केला आहे. त्यांनी नुकताच निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ झाला याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे कौतुक करीत एक मोठे विधान केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

    निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निब्रळ येथे जलपूजन करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. निळवंडेसाठी ५३ वर्षे वाटं पाहावी लागली. प्रकल्पाबाबत अनेक चढ-उतार आले. झालं गेलं गंगेला वाहिलं आता स्वच्छ पाणी येणार. मी शेतकऱ्यांचा मुलगा हे काही लोकांना सहन होत नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा दिवस रात्र काम करतो. अनेक सूचनांचा आदर करणार हे सरकार आहे. आमचं मंत्रमंडळदेखील दिवस रात्र काम करतात. कारण शेतकरी हा अन्नदाता आहे. कुणालाही मोबदल्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही. काल कॅबिनेट मंत्रीमंडळात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आलं आहे. हे सरकार अनेक प्रकल्प मार्गी लावत आहे. प्रत्येक गोष्टीला सरकार प्राधान्य देत आहे. यापुढे कोणत्याही कामाला निधी कमी पडणार नाही. कारण मी फक्त सांगतो आणि ते तिजोरी खोलतात.

    पहिल्या दिवसांपासून आम्ही सामान्यांसाठी काम केलं आहे. सरकारचे सर्व निर्णय हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. मविआ सरकारच्या काळात फक्त एका प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. शेतकऱ्यांच्या आयुष्यांत चांगले दिवस येणार. आजदा दिवस हा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा आहे. ३२ गावातील पाणीपुरवठा योजनेला फायदा होणार. नगर जिल्ह्यातील१०७ आणि नाशिक जिल्ह्यातील ११३ गावांना फायदा होणार आहे. सरकारकडून अनेक प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेचा अनेकांना फायदा. ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली. महायुतीचं सरकार हे सगळ्यांचं सरकार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.