Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिवराज्याभिषेकपूर्वी रायगडावर दुर्घटना : कामगाराचा दुर्देवी मृत्यू
    क्राईम

    शिवराज्याभिषेकपूर्वी रायगडावर दुर्घटना : कामगाराचा दुर्देवी मृत्यू

    editor deskBy editor deskMay 31, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था 

    राज्यात येत्या  ६ जून रोजी रायगड येथे राज्याभिषेक सोहळ्याची तयारी सुरु आहे तर राज्यातील अनेक शिवभक्त गडावर येणार आहे. त्यासाठी मोठी सजावट करण्यात येत आहे. त्याआधीच  एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. राजदरबार येथे सजावटीचे काम करताना एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर ६ जूनला राज्याभिषेक सोहळा आहे. यासाठी गडावर सजावट करण्यात येत आहे, यातच ही धक्कादायक घटना समोर आली आहे. गड किल्ल्यांची दुरावस्था होत चालली आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी किल्ल्यांच्या डागडुजीची कामे सुरु झाली आहेत. काही गडांवर सजावटीच्या कामालाही सुरुवात झाली आहे.

    ६ जूनला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडणार आहे. याठिकाणी सध्या सजावटीचे काम सुरु आहे. हे काम करताना गडावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. काही व्यक्तींवर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यातील एका व्यक्तीला विजेचा तीव्र झटका बसला. शॉक लागल्याने तो जागीच कोसळला. शॉक लागून व्यक्ती खाली पडल्यावर त्याला वाचवण्यासाठी उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. तातडीने या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासले असता मृत घोषीत केले. पुढे त्याचा मृतदेह महाडच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. मृत कामगाराचे नाव आणि ओळख अद्याप समजू शकलेली नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    धक्कादायक : प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. शेख यांच्या धारदार शस्त्राने हल्ला !

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.