• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आ.बच्चू कडू यांनी केला या लोकसभा मतदार संघाचा दावा !

editor desk by editor desk
May 27, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
आ.बच्चू कडू यांनी केला या लोकसभा मतदार संघाचा दावा !

अमरावती : वृत्तसंस्था 

राज्यातील भाजप व शिंदे सरकारचा मंत्री मंडळावर नेहमी आपली बाजू मांडणारे आ.बच्चू कडू हे सातत्याने आक्रमक पवित्रा घेत असतात पण सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघावर प्रहारच्या बच्चू कडू यांनी दावा केल्याने खासदार नवनीत राणा यांची डोकेदुखी वाढली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघावर आम्ही लक्ष केंद्रीत केले असून भाजप-शिंदे गटाच्या युतीत आम्हाला ही जागा मिळाली नाही तर आम्ही स्वबळावर लढू, असे बच्चू कडू म्हणाले.

काही दिवसांपूर्वी गुवाहाटीतील सौदेबाजीवरून रवी राणा यांनी बच्चू कडू यांना डिवचले होते. यावेळी दोघांमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले होते. नंतर हा वाद थेट हमरीतुमरीपर्यंत आला होता. अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला. मात्र आता बच्चू कडू यांनी थेट रवी राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांच्या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे या वादाला पुन्हा फोडणी मिळण्याची शक्यता आहे.

अमरावतीच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. आमची तयारी असून मी देखील या मतदारसंघातून विधानसभा लढलो होतो. कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेताही मी लढलो आणि 5 हजार मतांनी पडलो. त्यामुळे आम्ही या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून उमेदवारही सज्ज आहे, असे बच्चू कडू म्हणाले. नवनीत राणांविरोधीत लढण्याची वेळ आली तरीही त्या ताकदीचा आमचा उमेदवार असल्याचेही ते म्हणाले. देशात मोदींचे सरकार असून राज्यात देवेंद्र फडणवीस प्रमुख आहेत. देवेंद्र फडणवीस आमच्या पाठी खंबीरपणे उभे आहेत. कोण कुठली जागा मागतेय याचा निर्णय मोदी, अमित शहा आणि फडणवीस घेतील. कोणी कितीही दावे केले तरी ते खोडून काढण्याची ताकद रवी राणामध्ये आहे, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्या दाव्यानंतर दिली.

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगाव जिल्ह्यातील ७५ हजार लाभार्थ्यांना मिळणार लाभ..!

Next Post

बारावीची परीक्षा महागली ; शिक्षण मंडळाचा निर्णय !

Next Post
बारावीची परीक्षा महागली ; शिक्षण मंडळाचा निर्णय !

बारावीची परीक्षा महागली ; शिक्षण मंडळाचा निर्णय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group