जळगाव : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३ जून रोजी जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. ‘ शासन आपल्या दारी ‘ कार्यक्रम अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ७५ हजार लाभार्थ्यांना त्यांच्याहस्ते योजनांचा लाभाचे वितरण केले जाणार आहे.
जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना संभाव्य दौरा मुख्यमंत्री कार्यालयाकडून शुक्रवारी मिळाला आहे. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे हे ३ जून ला दुपारी साडेचार वाजता जी. एस. ग्राऊंडवर लाभार्थ्यांना भेटणार आहेत आणि विविध योजनांचा लाभ वितरित करणार आहेत.
७५ हजार लाभार्थी
जिल्हा प्रशासनाने २ लाख २१ हजार ८२९ जणांची लाभार्थी म्हणून नोंद घेतली आहे.या कार्यक्रमासाठी मात्र विविध विभागातील ७५ हजार लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.त्यांना प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभ वितरित करण्यात येणार
या योजनांचे असे आहे लाभार्थी
पंतप्रधान आवास ७५.४०३. सरकार सेवा ३०,६५५, क्षयरोग योजना २,१४५ समग्र शिक्षा ८,४०९, कृषी यांत्रिकीकरण १,०९९, शिष्यवृत्ती २२,५६८, बाल संगोपन १,८४८, खाद्य विकास १,६६६. वृध्दापकाळ योजना २००, ड-श्रम पोर्टल २,०००, विकास योजना २.३६६.