प्रतिनिधी प्रविण पाटील: राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव व श्री राजपूत करणी सेना, जळगाव यांच्या मार्फत देण्यात येणारा सन २०२०-२१चा कृषी भूषण पुरस्कार पि.के.पाटील यांना खा उन्मेष पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
आज जळगाव येथील सौ.संदीपा ज्ञानेश्वर वाघ यांच्या राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था व श्री राजपूत करणी सेना, जळगाव तर्फे आयोजित तसेच खान्देश कुणबी मराठा वधू-वर गृप,गौरी समुह,वावडदा यांच्या सौजन्याने किड्स गुरूकुल स्कूल, जळगाव येथे खासदार उन्मेश पाटील यांच्या शुभहस्ते गजानन ठिबक सिंचन संचालक तथा आपल्या शेतात विविध नाविन्यपूर्ण प्रयोग विक्रमी उत्पादन घेतात व त्यांची ही कृषी क्षेत्रातील यशोगाथा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरक ठरेल कृषीप्रधान देशांतील कृषी संस्कृतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपलं प्रगतशील शेतकरी म्हणून मोठे योगदान दिले आहे.
यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव व श्री राजपूत करणी सेना, जळगाव यांच्या संस्थे मार्फत देण्यात येणारा सन २०२०-२१चा कृषी भूषण पुरस्कार जळके पि.के.पाटील यांना प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला माजी आमदार मनिष जैन, प्रसिद्ध केळीतंज्ञ मा.के.बी.पाटील, कृषी उपसंचालक अनिल भोकरे साहेब, श्री राजपूत करणी सेनेचे विभागिय अध्यक्ष प्रविण सिंह पाटील,सिंगल वुमन फाउंडेशनच्या अध्यक्षा मिनाक्षी चव्हाण , खान्देश कुणबी मराठा वधू-वर परिचय गृपचे संस्थापक अध्यक्ष सुमित पाटील, किड्स गुरूकुल स्कूलचे संचालक आदेश ललवाणी सर यांची प्रमुख उपस्थिती होती इतर मान्यवर या पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी उपस्थित होते
याठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचे राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा संदीपा ज्ञानेश्वर वाघ यांनी आभार मानले.