धरणगाव : प्रतिनिधी
एरंडोल तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक जिल्ह्यात चर्चेत आलेली होती. त्यानंतर या समितीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एक हाती सत्ता मिळविली आहे. पण आज होणाऱ्या सभापती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत चर्चेला उधान आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव – एरंडोल तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची आज सभापतीपदी निवडणूक होत आहे. यात प्रामुख्याने शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन नाना पाटील यांच्या पत्नी लताबाई गजानन पाटील या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. गजानन पाटील हे जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सोबत तब्बल २५ वर्षापासून एकनिष्ठ काम करीत असून त्यांना हि संधी मिळणार असल्याची चर्चा जोर धरीत आहे.