धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील चमगाव रस्त्यावर दोन दिवसा आधी सकाळच्या सुमारास एक ट्रक खताने भरलेला कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पकडण्यात आला होता. घटनास्थळावरून ट्रकचा चालक क्लीनर फरार होण्यात यशस्वी झाल होता. हि गाडी धरणगाव कृषी कार्यालयात लावण्यात आली असून अधिकारीनी नमुने घेत ते तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , तालुक्यातील चमगाव रस्त्यावर ट्रक (एमएच १८, बीजी ५८०३) मधून एका पिकअप व्हॅनमध्ये खताची गोणी भरली जात असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्याना मिळून आली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता त्या गाडीचा चालकासह क्लीनर फरार होण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर कृषी अधिकारी यांनी हि गाडी धरणगाव तालुका कृषी कार्यालयात लावण्यात आलेली आहे. तर यातील नमुने घेत ते तपासणीसाठी पाठविले असून त्या नमुन्यात जोपर्यत काही आढळून येत नाही तोवर यावर कुठलेही गुन्हे दाखल होवू शकत नाही असे देखील कृषी अधिकारी यांनी लाईव्ह महाराष्ट्रशी बोलतांना सांगितले आहे. जो पर्यत नमुन्यात काही हि तफावत आढळून येत नाही तोवर सर्वच खताच्या गोण्या सील केलेल्या आहे तर त्यानंतर गुन्हा देखील दाखल होण्याचे सांगण्यात आले आहे. पण ज्या दिवशी गाडी पकडण्यात आली तेव्हापासून ते आज पर्यत धरणगाव तालुक्यातील प्रत्येक गावात खताची पकडलेली गाडी सोडून देण्यात आल्याची चर्चा जोर धरीत होती. मात्र आता थेट अधिकारी यांनी खुलासा केल्यावर नमुना आल्यावर कुठला गुन्हा दाखल होतो याकडे धरणगाव तालुक्यातील शेतकरीचे लक्ष लागून आहे.