धरणगाव : प्रतिनिधी
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या विकास कामांचा धडाका आजही कायम असून आज धरणगाव तालुक्यातील नारणे या गावात विकास कामाचे भूमिपूजन व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज दि २६ रोजी धरणगाव तालुक्यातील नारणे या गावी जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजनेचे २४ लाखांचे काम तर २५/१५ अंतर्गत कॉंक्रीटीकरणाचे ५ लाखांच्या कामासह शेत शिवार बंधाराचे कामाचे भूमिपूजन आज होत आहे. या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची तोफ धडाडणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक नेत्यांचे लक्ष या जाहीर सभेकडे लागले आहे. या कार्यक्रमात धरणगाव तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.