धरणगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभलेली आहे. हीच परंपरा पुढे जोपासण्यासाठी राज्यातील अनेक गादीपती व कीर्तनकार आपल्या वाणीतून भाविकांना अध्यात्मिक उर्जा देत असतात. राज्यात कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले ह.भ.प.रविकिरण महाराज दोडाईचाकर यांनी आज जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील निवासस्थानी राज्यातील जनतेला आपल्या वाणीतून अध्यात्मिक संदेश देण्याचे काम करणारे ह.भ.प.रविकिरण महाराज दोडाईचाकर यांनी भेट देवून आशीर्वाद दिले आहेत. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा, राज्यातील प्रत्येकाच्या घरी जेव्हा साधू येतात तेव्हा आपल्या घरी जणू दिवाळीच असते, तसे आपण साजरा करीत असता.