जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेचा जुन्या भांडणाच्या कारणावरून वादातून पतीला मारहाण करीत महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्थानकात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय महिला आपल्या परिवारासह रहायला आहे. दि. २३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून गावातील सुनील आत्माराम ठाकरे, अशोक धोंडू धनगर, दीपक भानुदास धनगर यांनी महिलेचा हात पकडून अंगावरील कपडे फाडत तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिच्या पतीला देखील यावेळी मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी महिलेने थेट पहूर पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दिली असून त्यानुसार संशयित आरोपी सुनिल आत्माराम ठाकरे, अशोक धोंडू धनगर, आणि दीपक भानुदास धनगर या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप चौधरी करीत आहे.